Sunday, March 15, 2009

"रांडे, तुझं हे गाढवतोंड बघायला ठेवलाय का मला इथे?"
"का आलीस माझ्या समोर? तुला वाटलंच का यावसं ?"
"रडू नकोस आई झवाडे आता गळा काढून! बघा बघा ही कित्ती बिच्चारी !"
" चिचुन्द्रे , रडलीस तर फेकून देइन बाहेर. भेन्चोत इथे रडायला आलियेस का?"
"विझवटे, एवढ्या सगळ्या लोकांचा वेळ खातेस कामचोर! "
" भड़व्या तू कशाला सांत्वन करतोयस तिचं? ती झोपणारे खाली? "

मग भोकांड पसरल्याचे आवाज येऊ लागले. एक सावळ्या रंगाची बुटकी मुलगी घेरी येउन खाली पडली. कुणीच जागचं halalan नाही. एकटी इस्मत जागेवरून उठली आणि पाण्याची बाटली घेऊन त्या ग्लानी आलेल्या मुलीकडे वळली. सगळयांना आता ती काही तरी बोलेल असं वाटलं. तिने शिव्या देणारया तोंडाकड़े दृष्टी टाकली आणि तापलेल्या दगडावर पाणी पडावं तसं वातावरण चुरचुरू लागलं. कुल्ल्यांवर बसलेला हीरू कोणीतरी हाक मारल्यासारखा ताडकन उठला आणि इस्मतच्या मागे जाऊन उभा राहिला. तिथे आसपासच गुणगुणणारया एका माशीचा त्याला त्रास व्हायला लागला. मानेला पाच झटके दिल्यावर त्याने ती माशी तोंडात पकडली आणि शेपटी हलवत तो इस्मतच्या मागे ओढगाडीसारखा गेला. मशीदीत बांग सुरू झाली आणि एव्हाना भोकांड पसरलेली मुलगी स्वतःचा तोल सांभाळत, गाल पुसत नीट उभ रहायचा प्रयत्न करू लागली. बसलेल्या मुलांनी मांड्या उचलल्या आणि ढोप्रं हातांनी बांधली . त्यांचे मुंग्या आलेले तळवे आता ठणकू लागले होते. पण लक्षात येइल एवढी हालचाल करायला कोणीही धजावत नव्हतं. त्या मुलीने सलवार सारखी केली. ओढ्णी छातीभर पसरून कमरेजवळ बांधली.नाकातून दोनदा हवा आत ढकलली. आता ती पुढचं वाक्य बोलणार त्याआधी समोर बसलेल्या मुलांमध्ये काळजीची एक लाट पसरली.

'मी आता अशी अस्खालितपणे बोलून दाखवेन की तुम्ही सगळे तोंडात बोट घालाल.आणि तू तर शरमेनी मरशील
नालायका,तुझ कधीच भल होणार नाही तू तडफ़डत मरशील. तुझ्या गटारासाराख्या तोंडात कीडे पडतील. तुला जाळायला चार माणसंही येणार नाहीत.'हां विचार चाललेला असतानाच त्या मुलीने समोर बघितलं.तिला थोड़ा आत्मविश्वास मिळाला आणि तिला बरं वाटू लागलं.पण जशी तिने बोलायला सुरूवात केली तसा तिला शरीर गळून पडत चालल्याचा भास होऊ लागला. ट्यूब दाबून ठेवल्यावर पाणी थांबत थांबत वाहतं तसं तिचं बोलणंही अडखळू
लागलं. तिने दीर्घ श्वास घेतला.डोळे रूंदावले. तिची वाक्य आठवण्याचा जोरदार प्रयत्न केला. आणि मग तिच्या लक्षात आलं शिव्यांची लाखोली पुन्हा सुरू झाली होती. प्रत्येक शिवीबरोबर मनाचा एकेक बुरूज ढासळंत होता.समोर बसलेल्यांपैकी फ़क्त दोन चेहरयांवर किळस दिसत नव्हती. इस्मत आणि चारु.

पण इस्मत ही एरव्ही सुद्धा निर्विकार असायची.तिच्या बाजूला आकाशातून उल्का जरी पडली असती तरी तिने एक नजर टाकून तिला गार केले असते.श्रीमंतीचा आणि कुरुपतेचा माज तिच्या चेहरयावर असा चढला होता की ती कोणाशी गोड वागू शकणार नाही हे तिने तोंड उघडायच्या आधीच सगळ्या जगाला समजे.चारूसारखी मस्कापटटी तिला जमण हे तर निव्वळ अशक्य होतं.चारू ही सगळ्या ग्रुपची लीडर होती.कोणी तिला बिच म्हणायचं तर कोणी भक्ति बर्वे.पण इस्मत आणि चारू मध्ये नेहमी एक अंडरस्टँन्डिंग असायच.आणि त्या अन्दार्स्तान्दिन्ग्चा मध्यबिंदू आपण आहोत शिव्या खाणारया ह्या मुलीला वाटत असे.


शिव्यांचा जोर वाढत होता तशी तिने मटकन मांडी घातली,कोपरं मांड्यात रूतवली आणि तोंड हातात दाबून टी स्फुन्दू लागली.नाक आणि डोळे डबडबून गेल्यावर तिने श्वास घ्यायला तोंड उघडले.आवंढा गिळता गिळता तिला छातीत गळ लागल्याची जाणीव झाली आणि ती खोकू लागली.खोकून खोकून दमल्यावरही तिने वर पाहिले नाही.उभे राहून भोवळ आलेल्या मुलीकडे जऊन बसण्यापूर्वी इस्मत आपल्याला कमरेला पकडून इथपर्यअन्त घेऊन आली आणि तिने हलकेच आपल्या गालावर थप्पड़ मारली एवढे तिच्या लक्षात राहिले

आता पाळी चारूची होती.तिने उभा राहून जमिनीला नमस्कार केला.डोळे मिटले.शरीर विसरल्यासारखे केले.गवत डुलाव तसं बारीक लयीन डोकं एक बाजूकडून दुसरया बाजूकडे फिरवले.आणि अरण्यात विहार करणारया एक सोनेरी हरिणाचं म्रुगन्रुत्य सरू केलं. कधी नदीवर पाणी पिताना अचानक श्वापदाची चाहूल लागल्याचं,तर कधी नुकत्याच सृजन झालेल्या बछड्यावर माया करतानाचं वर्णन,तिचं लयदार शरीर सुस्पश्ट्पणे करू लागलं.तिचा सुडौल बांधा चूडीदार -कुड्त्याच्या गवाक्षातून पृथुल दिसत होती.डोळ्यात,माळव्याच्या रानात पडलेला हिरवा सूर्यप्रकाश पडल्याचा भास् होत होता.नाकपुड्या टवटवीत आणि तीक्ष्ण हत्याराप्रमाणे भासत होत्या.तिचं सगळं अन्गं कलेने स्विकारलेलं.सावळ्या रंगाच्या तवंगाची साई पसरलेल तिचा शरीर घामाने काळपट सोनपट चकाकू लागलं.आणि ठाशीव कोरीव भुवया तितक्याच जाड ओठांप्रमाणे तालाचे बोल बोलू लागल्या तिने विस्तार केला आणि नुकतंच बाळ झालेल्या त्या हरीणाची कथा मांडली.


' मी ज्या ज्या वेळेस काही करण्याचा प्रयत्न करते त्या त्या वेळेस मी का यशस्वी होत नाही?आज मी माझा उतारा १५ वेळा घोट्वून गेले होते.तरीही मी वाक्य कशी काय विसरले?खरोखरच केतनसर म्हणतात तशी मी घरी बसायला पाहिजे का?अशी कोणती गोष्ट आहे की जी मी सर्वोत्तम करू शकते?का मी काहीच धड करू शकत नाही?सदैव हे असं लाचार घाबरतच जगायचं का मी?मला आनंदी व्हायला काय करावं लागणार आहे?पूजा शाह हे नाव केतनसरांना एवढ का तुच्छा वाटतं?'

सगळी मुलं आणि केतनसरान्चं फाटकं तोंड ज्यावेळेस चारूच्या थाम्बलेल्या, धपापणारया शरीराकडे बघत होतं तेव्हा
शिव्या खाल्लेली ही मुलगी निराशेच्या परमोच्च बिंदूला जाऊन पोचली होती. जनावराला काठ्यांच्या ढुश्या देऊन त्याच्यात प्राण आहे की नाही ते बघतात तसंच ती स्वतःचा आत्मविश्वास तपासून पाहत होती.

सगळ्या मुलांच्या पर्फोर्मंसा नंतर केतन सरांनी सर्वांना जायला सांगितलं.चारू आणि इस्मत दोघी जणी वेगवेगळ्या दिशांना दोन ध्रुवान्सारख्या फाकल्या.चारूने पाय टाकून हीरूला मांड्यात पकडले.त्याच्या कानाखाली खाजवत खाजवत ती त्याचे लाड करू लागली.केतनसरान्नी पूजाचा हात धरून तिला बाहेर काढले.काही कळायच्या आत ती बिल्डिंगच्या बाहेर उभी होती .आणि सर तिला बरोबर घेऊन चालले होते.त्यांनी पाणी पुरी खाल्ली.उकडलेले चणे विकत घेतले.समुद्रकिनारयावर मका खात असताना पूजाला वाटलं नव्हतं की सर आपल्याला बरिस्तामध्ये काँफी प्यायला घेऊन जातील.तिला हे स्वप्न आहे की काय असा प्रश्न पडला.तिला वाटल की आपण हिला खूप बोललो म्हणून सरांना पश्चात्ताप झाला.म्हणून नुकसान भरपाई करायला ते आपल्यावर एवढा खर्च करतायत.कोफिचा एक घोट घेत आणि पूजाला बर्गर ऑफर करत सर म्हणाले
"पूजा.मी सांगतो ते नीट ऐक.तू हुशार मुलगी आहेस"
"सर,तुम्ही जर शिव्या दिल्या नाहीत तर मी काय म्हणाल ते ऐकेन."
" काळजाला घरं पडतात ना शिव्या ऐकल्या की!"
"फार वाईट वाटतं हो.सगल्यान्मध्ये आपली अशी नाचक्की होताना.सीतामाई सारखी भूमि आपल्याला गिळत का नाही असं वाटत.मला विश्वासच नाय बसत.तुम्ही एवढ्या शिव्या घातल्या आणि तुम्हीच मला बरिस्ता मध्ये कोफी पाजताय.तुम्हाला मला कही बँड न्यूज तर नाही ना द्यायची आहे?"
"होय.न्यूज वाईट आहे.उद्यापासून तू वर्कशॉप ला यायचं नाहीस"
"सर...का?"
"कारण तू इथे येऊन स्वतःची आणि माझी एनर्जी फुकट घालवावीस असं मला वाटत नाही.तुझ्यापेक्षा डल मुलांनी करायचं काय?तू फटाफट शिकशील.पण तू ह्या फील्ड मध्ये राहणार नाहीयेस.तुझ्या चेहरयाकडे बघ.इतकं कन्व्हिन्सिन्ग थोबाड आहे तुझं की सांगणारया व्यक्तीचं सगळ सांगणं फक्तं तुलाच मिळतं.जी विद्या तू कधी वापरणारच नाहीस ती तुला देऊन मी बाकिच्यांचं नुकसान करू शकत नाही.इतके दिवस आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त शिव्या खाणारी तू आहेस.तुझ्या बरोबरच्या एकाही मुलीने माझ्या इतक्या शिव्या ऐकल्या नाहीयेत.कारण ज्यांनी ऐकल्या त्या कधीच दुसरया दिवशी आल्या नाहीत.अपवाद फक्तं इस्मतचा.तिने सगल्या शिव्या पचवल्या आणि दुसरया दिवशी परत आली.आता ती कुणालाच घाबरत नाही.'माझं लग्न ठरवलंत तर पोलिस कम्प्लेंट करेन' असं घरच्यांना म्हणाली.पण तू असं करू शकशील का?तिची परिस्थिति आणि तुझी परिस्थिति वेगळी आहे.रिअलिस्टिक हो.नशीबाच्या भरवशावर राहू नकोस.नशीब माणसाचा सगळ्यात घातक मित्र आहे"

"एकच विचारू? चारू सारखा मी कधी अभिनय करू शकेन का?"

बरिस्तामधून बाहेर पडल्यावर सरांनी पूजाला रिक्षात बसवल.आणि घरी येइपर्यंत पूजाचं तोंड रडून रडून स्त्राँबेरिच्या बोन्डासारखं लाललाल झालं होतं.रिक्शा वाल्यापासून रस्त्यातल्या काकूबाइन्पर्यन्त सर्वांच्या नजरा
तिच्या कड़े वळत होत्या.
"ह्या मुलीला झालं तरी काय?"दादीमाँनी आपल्या मुलाला कानात विचारलं.

पूजा आत गेली.खिचडीची डाळ धुणारया आपल्या आईच्या डोळ्यात बघितलं.आणि तिचा अश्रूंचा बाँध पुन्हा एकदा तुटला.आईने तिला पोटाशी धरलं.

"सू थयू?"
"काई नई.सरे मने किदू के हूँ दुनियानी सवती बेस्ट कलाकार छू!"
ॐकार कुळकर्णी.

_________________________