Friday, June 13, 2008

सम्राट

सम्राट



खडकांना फुटती जिव्हा
सम्राट सलाने न्हातो
स्थल - एकांताच्या गावी
मी रडकी गाणी गातो

गाण्यांनी हतबल माझया
अग गहिवरला गुलमोहर
आईच्या माथ्यावरचे
घनदुख्ख मेंदीचे केशर

ती घरटी जाळून जाते
अथांग दीप्तीचे मण्डळ
मी विझल्या अंतर्नादी
करी वन्ध्यत्वाची चंगळ

घोटीव आकृती विराणी
अन क्रूर अडाणी भुवई
सम्राट मिळवतो भिक्षा
मुकुटी शून्याची झीलई

झिरझिरीत संध्याकाळी
सम्राट सुडाने जळतो
भडकाग्नीचा गुलमोहर
शाखात फुलांनी गळतो

राणीच्या सवती साऱ्या
रति रास विलासी करती
मी अंध- इस्त्रिचा सदरा
होळीच्या रस्त्यांवरती

होळीत मिळाला साजण
ती जया मायने लावी
माझ्यासम साठी ज्याच्या
तिने रडकी गाणी गावी

अन एकांताच्या गावी
रंध्रा रंध्राने रडावे
रडक्या रडक्या राणीला
राजचे दुखः कळावे

मग साजण सचिंत तिज्ला
मिलनाचे चुम्बन देईल
राजाचा राजस पुतळा
मग भुकटी भुकटी होईल

सन्दर्भ खुनाचे राजा
राखेत सलाने पुरतो
अतृप्त मनीषेसाठी
सम्राट निनावी मरतो .

ॐकार कुळकर्णी


















No comments: