पाऊस
पाऊस अचानक पडला
उष्म्याच्या ऐन दुपारी
बिलगून मला ती राहे
निथळथळ्त्या त्या पारी
वर्षेची टिम्बे नाना
कान्तिवर गोंदवलेली
गालांची निषिद्ध फ़ळे ती
भिजक्या केसांच्या वेली
चाफ्याचा मोहक दरवळ
भिजल्या देहाचा वाळा
उघड्या आरक्त गळ्यावर
रेखीव तिलांची माळा
आकाश वरी गडगडते !
घनघोर वीज कडकडते !
धडधडते !धडधडते !
हृदयी काही धडधडते !
ओमकार कुलकर्णी
No comments:
Post a Comment