विकास
वर्षभर सुतारकाम केलेला विकास यादव
आता उभा आहे सुरक्षारक्षकाच्या गणवेशात
एका अमेरिकन हँगाउटच्या बाहेर
आत जाणारया भारतीयांवर नजर ठेवत.
पँकवर प्राइस टैँग चिकटवावेत अगदी तसेच
भिंतीवर एल सी डी पसरलेयत उभे आडवे
आणि त्यातल्या एकावर दिसणारया २०-२०साठी
हँग आउटच्या काचे बाहेर जमलीये कामगारांची गर्दी
माना सरसावलेल्या गर्दीतून एक हात उठतो
आणि विकासची नजर पकड़ते न्युजमधील पप्पुकुमार
ज्याला विकासने बदडून काढला होता
स्वतःच्या बायकोवर एकतर्फी प्रेम केल्याबद्दल
आणि विकास पुन्हा पाहतो स्वतःचा मुजफ्फराबाद
आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो पप्पुची कहाणी
त्याला मामुलीच येत असलेल्या इंग्रजी भाषेत
आणि वाचतो न समजणारे इंग्रजी मथळे
त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते तेव्हा
गौना झालेली गंगा पाणकमळासारखी टरारलेली,
चेहरयावरून पदर घेताना ती हळूच बांधत असेल
त्याच्या न झालेल्या स्पर्शाचे आसक्त अंदाज
आणि उभे राहतात त्याच्या डोळ्यासमोर कर्जदार
गाडीहुन्ड्याचि ऑफर देणारे उतावीळ बाप
आणि डोळ्यासमोर पिंगा घालतात त्याला चुकलेली
घरदार, शेतीवाडी उद्ध्वस्त केलेली पूर-वादळे
तो ऐकतो बाहेरच्या गर्दीची उत्कंठा
त्यांच्या गावचा माही फुगवतो त्यांचा ऊर,
तो ऐकतो आतला हसीमजाक हिन्दी इंग्लिश गुजरातीत
विजेच्या खांबाला चिकटूनही वाचलेल्या
एक स्माँल टाऊन पप्पुकुमारवर केलेला
आणि सज्ज होतो विकास
व्हलेन्टाइन्स डे , ख्रिसमस, आणि संस्कृतिविरोधक
दिवस बंद केलेले असताना,
कर्फ्यू किंवा आतंकवादी हल्ल्यात गोळीबार चालू असताना,
विषारी वायूच्या किंवा गँसच्या गळतीने
आगीचे लोण पसरलेलेले असताना
किंवा पालिकेच्या रुग्णालयात खाट मिळवताना,
जगण्यासाठी,
जाहिरातीतल्या हसरया चेहरयात बायकोचा चेहरा शोधत
मुजफ्फराबादचा पप्पुकुमार टी व्ही वर बघून
स्वतःच्या निनावी अस्तित्वाचा रखवालदार म्हणून.
ॐकार कुळकर्णी