Saturday, May 23, 2009

काय?

हमरस्त्यावरून
दिवस निघून गेलेला
त्याच्या सोन्गटी माणसांसकट.

ठिकठिकाणी
सावल्यांच्या चादरी
विस्कटलेल्या

तू श्रीखन्डासारखी
हसू नकोस
मनाचा फुटबाॅल
धावतोय पायात

कारण काढून रुसू नकोस
घर आलय टप्प्यात

तू जाणार जाणार मी
एकाला दुसरा कमी

हात ,ओठ ,डोळे
एक व्हायला कमी पडतायत?


No comments: