Saturday, May 23, 2009


निनावी

ज्यांची बोटे धरलेली
ते घेऊन गेले तिकडे
अथांग जिथले पाणी
अन चटकन सोडून गेले

आवाज जिथे बहिराळे
स्नायून्ना नाही माई
भवताल भुकेला भरती
सोन्याची घुसमट खाई

माताही उरली नाही
तर पिंड पुरवतो कोण ?
गाण्याच्या आधीच दाहक
निर्ध्वनी पसरतो लोण

खोटयास डूब आबाची
जो दाब मनावर लोटे
संत्रस्त ग्रस्त चर्येत
किरट्या घराचे खेटे.

No comments: