Sunday, May 23, 2010

सुनीत

एके दिवशी कळले , असता नेत्र उघडले जेव्हा
स्वप्न म्हणावे कि वास्तव जे समजू शक्य न झाले .
दोरयांवरूनी ज्या , बागांतुनि आंदोलत हिंदोळे
त्या तुटल्या तटतट स्नेहाच्या रेशीम गाठी केव्हा ?

शांत दिनांनी भरले होते किनखापी क्येलेंडर
होति पसरलि दिवस असो कि रात्र असू दे नशा
धुंदीने चार स्फियर भरलेले , अवघडल्या चहु दिशा
असे निरभ्र अवकाश , त्यामध्ये कसली पडली थंडर ?

साठवण्यास्तव प्रयत्न केला अंतरीचा लव्ह डेटा
शब्द , ध्वनी अन चलत चित्रही सगळे केले गोळा
स्प्रिंग फुलांची बनते विंटरी , जशी शिळा पाचोळा
कळे न कसल्या म्येलवेयरे सिस्टीमी झाला तोटा ?

मनी प्रेम म्हणावे ज्याला , जगि नुसते ते वेडेपण
जग म्हणते प्रेमी वेडा , तरि असते प्रेमी आपण

ओंकार कुळकर्णी
२४.०५.२०१०

No comments: