Thursday, May 27, 2010

सुनीत २

टप्पा पडुनी चेंडू उडतो पृथ्वीवर आकाशी
परंतु पुन्हा पडतो खाली , जेव्हा शक्ती जाते.
करण्या जाते शौर्य सागरी जणू हे हृदय खलाशी
नजर तुझी ती खोल पाहता , चट माघारी फिरते.

वेगवेगळ्या शब्द - खुणा मी तोंड पाठ केलेल्या,
तुला भेटता करता यावा ज्यांचा मज उपयोग.
जीभ पांगळी लटपटते. तू केस मोकळे केल्या -
नंतर! डसतो मला जसा कि स्मृतीभ्रंशाचा नाग !

तीन तासाची फिल्म पाहतो , मुग्ध मनाने . मी तर
तुला पाहतो ठिकठिकाणी ! दिसतेस बागडतांना !
पण हिरो - मी जखमी होता , सत्वर होशी कातर.
फिल्म मधील तू बाहेर ये अन इथली तिकडे जा ना !

क्लायमेक्स तीन तासांनंतर असतो हेपी एंड
जहाल नजरे नंतर तरि दे शब्द प्रेमाचे थंड

ओंकार कुलकर्णी

No comments: