Friday, May 18, 2012

ऑनेस्ट्ली

तुझ्या बीयरचा ढेकर पुसट आला नाही
लोकांत निसटून जाणारा सूर धरला नाही
प्राप्त ऑनेस्टीचा पारावार उरला नाही म्हणून
तर बोअर झालो तुला समजावून समजावून.

कित्ती वेळ रिपीट केलं की रेस मानू नकोस
तुला कोणी सांगितलंय की माझ्यापर्यंत पोच.
साध्या साध्या वाक्यांवर तिसरंच रियॅक्ट होशील
तर दोघांमधलं तिसरेपण काय घंटा पचवशील.

इट्स बेटर, अजून रुटिन नाहीये, कस्टम नाहीये
वेडीवाकडी, वाट्टेल तशी, व्हेग नदी चाललीये.
अजून प्रॉप्पर दृष्टी नाही, काय बघणारेय आयुष्यात
प्लॅनिंग बिनिंगची जय हो पण मी नाहीये हृयात.

- ओंकार

Monday, May 14, 2012

ट्रोजनाश्व


नव्याने माझा 
जुना सीन म्हण,
प्रॉम्प्ट कर

स्पेशल सीनेय
ओपनिंग वाक्यंय
ट्रोजनाश्व.

राईड कर
दगदग होईपर्यंत
लीड कर.

तुझं दुसरेपण 
ओव्हरराईट कर


----------------

मग दिशा बदलू
मूड लायटिंग करु

मग एक प्रश्न पडेल
आपल्याला पुढच्या
सिच्युएशननंतर -

हे जे तेहेसमेहेस
करुन तक्रार म्हणून
उरलो आपण
त्या  जागी
घरी गेल्यावर
तव्यावर प्रेम टाकून
डीप फ्राईड कविता 
बनवण्याचा,
चट्टामट्टा
करण्याचा
सीन होता.
तो कुठे गेला ?

उलटी सरळ


एका बाजूला
ही ऽऽऽऽऽऽऽऽ 
मोठ्ठी दरी

हे असे
लांब लांब
शटल करणारे
मरणांचे एको.

सन्सेट टोकावर
मॅड मॅड रश.

कोणी दारु
पाजल्यासारखा
नागमोडी नाचणारा
ब्लड रेड धुरळा.

माने मागे रेलिंग
खांद्यांची बेचकी.

शरीर कडक
होऊन जाणार
इतक्यात तुझी
उलटी सरळ 
आकृती दिसली.

प्लॅन बी

प्लॅन बी

प्लॅन बी - सोक्षमोक्ष उगाच ठेवला नाही
तुझ्या अर्बन दुःखांमधलं अर्जन्ट दुःखंय मी
मी काय करतोय तुला कळणार नाहीये, नोअप्.
घामाळ गुंगीमध्ये घायाळ करण्याचे आरोप.

स्टोरीबोर्डिंगला बसलो आणि थंबनेल्स काढल्या
चित्रं जमली नाहीत सो कॉन्सेप्ट्स लिहून टाकल्या.
सगळ्यांमध्ये खोटे ठरु म्हणून खोटंच बोललो
दात दुखावा तसा काळोखात दुःख धरुन बसलो.

दोन मिन्टं कोणालाच शांत बसता नाही आलं.
रेकॉर्ड करुन ठेवलं तर प्युअर आश्चर्य वाटलं.
जाण्यापूर्वी नेमकंच बोलता आलं असतं
वेळ मिळाला असता, अवघडलेपण नसतं.

ओंकार