Monday, May 14, 2012

प्लॅन बी

प्लॅन बी

प्लॅन बी - सोक्षमोक्ष उगाच ठेवला नाही
तुझ्या अर्बन दुःखांमधलं अर्जन्ट दुःखंय मी
मी काय करतोय तुला कळणार नाहीये, नोअप्.
घामाळ गुंगीमध्ये घायाळ करण्याचे आरोप.

स्टोरीबोर्डिंगला बसलो आणि थंबनेल्स काढल्या
चित्रं जमली नाहीत सो कॉन्सेप्ट्स लिहून टाकल्या.
सगळ्यांमध्ये खोटे ठरु म्हणून खोटंच बोललो
दात दुखावा तसा काळोखात दुःख धरुन बसलो.

दोन मिन्टं कोणालाच शांत बसता नाही आलं.
रेकॉर्ड करुन ठेवलं तर प्युअर आश्चर्य वाटलं.
जाण्यापूर्वी नेमकंच बोलता आलं असतं
वेळ मिळाला असता, अवघडलेपण नसतं.

ओंकार

No comments: