उलटी सरळ
एका बाजूला
ही ऽऽऽऽऽऽऽऽ
मोठ्ठी दरी
हे असे
लांब लांब
शटल करणारे
मरणांचे एको.
सन्सेट टोकावर
मॅड मॅड रश.
कोणी दारु
पाजल्यासारखा
नागमोडी नाचणारा
ब्लड रेड धुरळा.
माने मागे रेलिंग
खांद्यांची बेचकी.
शरीर कडक
होऊन जाणार
इतक्यात तुझी
उलटी सरळ
आकृती दिसली.
1 comment:
आत्मभानाचा लुच्चा आचका, अन खुंटीवरचं मरण..
Post a Comment