Monday, August 26, 2013

ऊबर कूल्



जास्त न बोलता अख्खी रात्र  बाहेर काढायचा निर्णय घेतला
फक्त हातात मॅप्स आणि चालवायला वाहन होतं ढुंगीखाली.
मस्त प्रोटीन शेक घेतला होता तेवढ्यात निघण्याआधी
तर पोलीसबिलीस सडाफटिंग तयार होतो रिस्क घ्यायला.

चाळीत राहिलो असतो आणखी काही दिवस जमा करुन
हृया त्या कोर्सचे कागद, पुस्तकं, फ्लायर्स, बियर्स असती
जेव्हा जे जे करायचं असेल त्याला मेबी एक ईझ नसती
आणि सगळं धम्मा‍ल मज्जे‍त असलं असतं तिकडे. असू देऊ.

रात्र फिरण्यात घालवायची तर वेगळी मज्जा‍ पायजे बूस्टर.
दिवसा थोडं झोपून थोडी म्हणूनच स्वप्नं क्लिक केली
तर पुन्हा एकदा मॅप्स आणि वाहनंच होती कॉपीवरती.
काही लव्हली चेहरे मिसिंग होते आणि स्पेस होती सोबर.

लऊ - बिऊचे वळणदार रस्ते क्रॉस केले ज्या त्या वेळी
की डायरेक्ट मॅच्युअर मॅच्युअर शोध घेऊ शकतो ना
आदल्या रात्री मास्क घेऊन झोपले चांगले बाजूबाजूला
म्हणून कोणीच स्माईल करत गंडणार नाही पुढच्या वेळी

कोणाकोणाचे फोन्स आणि कॉलरट्यून्स अवॉइड करुन
काय करायचं कोणाशी बोलायचं हे सर्वार्थानी ठरवलं
तर विशेष काही मोजकेच मुंजे झपाटतात हे कळलं
बाकीचे सर्व चॅनल्स, ज्यांना परतवता येतं सर्फ करुन.

पिवळ्या मुंबईच्या पांढर्‍या रस्त्यांवर हॉटेलच्या लॉबीत
मध्यरात्री फुशिया पिंकचा वन पीस त्यावर गॉगल तुझा.
वॅक्स्ड मांड्यांवर चीझी ग्लॉस थिन क्रस्ट प्रॉब्लेम पिझ्झा
ठेवलाय ऊबर कूल ओठांवर सॉल्टी संकर बोलीत.

No comments: