हातावर चुरचुरीत चटका दिल्यावर
फिरून त्याच जखमेला चुंबन देउन
मातुल कर्तव्य दाखवावे तसे तू
परागंदा झालीस डिपार्चर डि मधून
त्या दिवशी पावसात वाफेचे फूत्कार टाकणारी
माझी जखम कुणी पाहिली नाही
पण हळू हळू भळभळणा-या जखमेच्या ओढ्याला
सापडले मुख ह्या कागदावर जिथे ती एकटी नाही.
1 comment:
chan aahe.. thodi surreal watte..pan avadli.. specially shevatchya don oli.. apratim aahet..keep it up :)
Post a Comment