Thursday, January 3, 2013

मिडनाईट इंटरल्यूड

ओंकार कुलकर्णी आणि नेहा जोशी यांची ही शॉर्ट फिल्म काल पाहिली. शहरात एकटा राहणारा तरुण आयटी तज्ञ आणि त्याची एक मध्यरात्र – असा विषय. मनोव्यापारांचे तंत्र या पद्धतीने त्याचा हा जीवनतुकडा त्याच्या एकूण जगण्याचाच वेध घेतो. एकच खोली, बियरच्या बाटल्या खाली पाडून फोडणारे उंदीर, नळाला पाणी नसणे, संडासात गाणे म्हणावे तरी शेजाऱ्याला त्रास, दुरावलेली प्रेयसी, संवाद नसणे, एकाकीपणा – हा सगळा नमूना आपल्यापुढे आधुनिक झगमगीतपणाचा फील देत सादर होतो. प्रत्येक गोष्ट अशी खरेच घडली का, हा प्रश्न नाही. त्याने हाताची नस कापून घेणे हे मनात साठत चाललेल्या हिंसेचेही सूचन करते. अशा जगण्याची हीच होणार परिणती – असे वाक्य आपल्या डोक्यात येतानाच – आपलेही असेच क्रियाप्रतिक्रियांचेच आयुष्य ताबाहीन चाललेले नाही का – हा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. आजच्या जगण्याचे दर्शन घडवत काही मूलभूत प्रश्न ही फिल्म समोर आणते, हे महत्त्वाचे आहे. मधेच “ इतिहास शिका, इतिहासातून शहाणपण येते “ अशा अर्थाच्या काही वाक्यांचे आवर्तन आहे. ते तर अनुभवातून शिकण्याच्या कल्पनेचीच खिल्ली उडवणारे आहे ! याच संदर्भात, त्याची पुस्तके जाळण्याची कॄतीही बरेच सांगून जाते. जमल्यास जरूर पाहा ही फिल्म. थोडक्या वेळात उत्तम, अर्थपूर्ण अभिव्यक्ती !

- @chandrakant deshpande
http://www.punemirror.in/article/63/201210242012102408010545c19088d4/The-short-punch.html

The short punch

Midnight Interlude at just 20 minutes creates an impact with its intricate characterisation
Mrunmayi Ainapure
     
Posted On Wednesday, October 24, 2012 at 08:01:00 AM

A filmmaker doesn’t always need a strong script and hard-hitting dialogues to convey a point. Cinema, as a medium, has its own innate language. We’ve all heard of the cliche ‘A picture speaks a 1,000 words’. 

Yet, our cinema banks on verbosity. So I decided to break away from the tested routine and make a film sans a script or dialogues!” shares Omkar Kulkarni. While acting in a number of Marathi films and serials, Omkar noticed a stark populist style in his works. 

“There were no experimentations, no desire for innovation. So I felt that instead of sitting and grumbling about it, I should go ahead and make the kind of art that would excite me, challenge me. That is how I ended up writing and directing the short film Midnight Interlude,” Omkar expresses. 

The story of a man in his 20s living alone in a city, and working in a corporate setup, Midnight Interlude touches the pathos of incomplete, unquenched desires in a materialisticallyfulfilling life.
 
“The protagonist, played by Sarang Sathaye, may be a techie by profession but he’s a musician and poet at heart, simply caught in the struggle for bread and butter. The film is shot in realistic angles but has some shades of absurdity as well. I’ve used a lot of imagery to convey emotions, for I believe art is a universal language For example, the turmoil and confusion in his mind is portrayed by abstract, distorted symbols.
 
Poetry is also an important motif used throughout the film,” Omkar informs. Although Midnight Interlude is just 20 minutes long, it’s shot in a very languorous, leisurely style, with enough scope for characterisation and the audience finding time to savour every element. 

“We made it a point not to let the time constraint compel us to compromise on the content. In fact, I request the audience to pay conscious attention to the little, subtle details that we’ve worked on painstakingly,” Omkar concludes. Catch the screening on Thursday, at the National Film Archive of India, 6:30 PM.

MIDNIGHT INTERLUDE - By - Omkar Kulkarni

by Anand Thatte on 25 November 2012 तारखेला 07:45 PM वाजता ·
आज ओंकार  कुलकर्णी ची  Midnight Interlude ही (Short)फिल्म बघितली . ही त्याची पहिलीच (Short)फिल्म .
आपल्याला ओंकार एक उत्तम कवी आणि एक हजरजबाबी व्यक्ती / शीघ्र विडंबन कार म्हणून परिचित आहे.
म्हणजे शब्द / भाषा या वरची त्याची पकड आपणा सर्वाना माहिती आहे .
नेमकी हीच गोष्ट तो हा सिनेमा बनवताना बाजूला टाकतो.
भाषेची गरज सिनेमा साठी किती? या मूलभूत प्रश्नाला तो भिडतो . आणि भाषा शक्यतो यातून वगळतो .
हीच गोष्ट संगीत या घटका बद्दल .
म्हणजे केवळ दृश्य प्रतिमां मधून आशय किती प्रमाणात (प्र)वाहित करता येतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
हे एकदा कळलं की मग सगळं सोपं होतं .
सुरू होते एक दृश्य प्रतिमांची मालिका . 
एक विशी-पंचविशी ला तरुण - त्याच्या आयुष्यातली एक मध्यरात्र - सगळी अंगावर येणारी - जशी त्याच्या अंगावर आली तशीच -
 वानगी दाखल काही प्रतिमा देण्याचा मोह आवरत नाही - 
१)  रस्त्या वरून रात्रीच्या वेळी बाईक वरून केलेला प्रवास- त्याच्या कवितांत देखील ही प्रतिमा येते.
२) त्याचं घर - (Pad) - तो एकटा रहाणारा तरुण - छोटसं - इथं (Mis-En-Scene) खूप छान झाला आहे 
३) वडिलधा-या व्यक्तीच्या हातात असलेलं प्लास्टर   जणू सर्व (Fracture) झालं आहे.
४) (Departure) असा फलक - नातं तुटणं ?
५) नाटका सदृश दृश्य मालिका  ( इथं आई दळते आहे(Now there is strainer) - बाप/ शिक्षक  दळतो आहे - पण आजोबा? -(Image of Wise Old Man?) 
६) तो आणि ती - एकमेकाला कपडे घालतात अगणित - आपल्या दांभिक व्यवस्थेवर तीव्र भाष्य?
७) नस कापून घेतल्या नंतर घाबरून(?) शेजा-याची बेल वाजवणे 
८) सगळी पुस्तकं जाळून टाकणं ( हे काय?) - सगळं परिचित नष्ट करणं ? की आता पर्यंतचं ज्ञान नष्ट करणं ?
ही दृश्य मालिका अपरिहार्य पणे आत्महत्ये कडे घेऊन जाते.
आजच्या (शहरी) तरूणपीढी  च्या वैचारिक अनिश्चितते चे हे प्रभावी चित्रण आहे.
 मला ही फिल्म खूप आवडली . 
तुम्हाला जर बघायला मिळाली तर जरूर बघा 
Unlike ·  ·  · सामायिक करा