MIDNIGHT INTERLUDE - By - Omkar Kulkarni
by Anand Thatte on 25 November 2012 तारखेला 07:45 PM वाजता ·
आज ओंकार कुलकर्णी ची Midnight Interlude ही (Short)फिल्म बघितली . ही त्याची पहिलीच (Short)फिल्म .
आपल्याला ओंकार एक उत्तम कवी आणि एक हजरजबाबी व्यक्ती / शीघ्र विडंबन कार म्हणून परिचित आहे.
म्हणजे शब्द / भाषा या वरची त्याची पकड आपणा सर्वाना माहिती आहे .
नेमकी हीच गोष्ट तो हा सिनेमा बनवताना बाजूला टाकतो.
भाषेची गरज सिनेमा साठी किती? या मूलभूत प्रश्नाला तो भिडतो . आणि भाषा शक्यतो यातून वगळतो .
हीच गोष्ट संगीत या घटका बद्दल .
म्हणजे केवळ दृश्य प्रतिमां मधून आशय किती प्रमाणात (प्र)वाहित करता येतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
हे एकदा कळलं की मग सगळं सोपं होतं .
सुरू होते एक दृश्य प्रतिमांची मालिका .
एक विशी-पंचविशी ला तरुण - त्याच्या आयुष्यातली एक मध्यरात्र - सगळी अंगावर येणारी - जशी त्याच्या अंगावर आली तशीच -
वानगी दाखल काही प्रतिमा देण्याचा मोह आवरत नाही -
१) रस्त्या वरून रात्रीच्या वेळी बाईक वरून केलेला प्रवास- त्याच्या कवितांत देखील ही प्रतिमा येते.
२) त्याचं घर - (Pad) - तो एकटा रहाणारा तरुण - छोटसं - इथं (Mis-En-Scene) खूप छान झाला आहे
३) वडिलधा-या व्यक्तीच्या हातात असलेलं प्लास्टर जणू सर्व (Fracture) झालं आहे.
४) (Departure) असा फलक - नातं तुटणं ?
५) नाटका सदृश दृश्य मालिका ( इथं आई दळते आहे(Now there is strainer) - बाप/ शिक्षक दळतो आहे - पण आजोबा? -(Image of Wise Old Man?)
६) तो आणि ती - एकमेकाला कपडे घालतात अगणित - आपल्या दांभिक व्यवस्थेवर तीव्र भाष्य?
७) नस कापून घेतल्या नंतर घाबरून(?) शेजा-याची बेल वाजवणे
८) सगळी पुस्तकं जाळून टाकणं ( हे काय?) - सगळं परिचित नष्ट करणं ? की आता पर्यंतचं ज्ञान नष्ट करणं ?
ही दृश्य मालिका अपरिहार्य पणे आत्महत्ये कडे घेऊन जाते.
आजच्या (शहरी) तरूणपीढी च्या वैचारिक अनिश्चितते चे हे प्रभावी चित्रण आहे.
मला ही फिल्म खूप आवडली .
तुम्हाला जर बघायला मिळाली तर जरूर बघा
No comments:
Post a Comment