पाच लीटर मापाच्या बादलीत
५००मीली कोमट पाणी घ्यावं
त्यात अर्धी वाटी
बीटाचा रंग येइल
एवढे रक्त मीसळावे
हे मिश्रण मंद आचेवर
उकळत ठेवावे
साइड बाय साइड
चॉप केलेले मांसाचे तुकडे
मॅरीनेशनसाठी मैदा ---लाल तिखट
आणी खमंग मसाला घालून ---
तसच बारीक़ तुकडे केलेली कोथीम्बीर
आणी मधात घोळव्लेले
काळेशार केस
ह्यांचे मीश्रण मळून घ्यावे
मिश्रण चांगले लुस्लुषीत झाले की
पाच मीनीटे पारदर्शक काचेच्या
झाकणबंद भाडयात मुरु द्यावे
त्यादरमयान इतर गोष्टी करता येतील
चांगलेचुंगले भरपेट खाण्याला
कल्पक सजावटीची जोड़ ह्वी !
तंगडयातील मांस काढून घेतल्यावर
हाडे फेकून देऊ नयेत
(बंगल्याच्या बाहेर मुक्त्शील्पात
कींवा आत वाॅलहॅगींगसाठी उपयुक्त ठरतील )
[बंगल्याबाहेर ठेवल्यास कलोन्मध्ये
बुडवून घ्यावीत अन्यथा दुर्गंधी पसरते ]
तसच आतडे , जठर , यकृत , यांसारखे पदार्थ
चीवट असतात ---पचायला जड़ जातात ---ते
नोकर्वर्गासाठी खास ठेवून द्यावेत
उरलेल्या अवयवांपैकी कलेजा , भेजा फ्रीज्मध्ये
साठवून ठेवावे व सावकाश चवीने खावेत
आता गरमागरम लीक्वीड आणी
मॅरीनेट केलेले मांसाचे तुकडे एकत्र करावेत
आपापल्या चवीनुसार मीठबीठ घालून घ्यावे
चला तर मग
तयार आहे गरमागरम
ह्यूमन मंचूरीयन
_____________
ॐकार कुलकर्णी
No comments:
Post a Comment