Tuesday, June 17, 2008

Visthapit

वीस्थापीत नद्या
आस्थापीत समीत्या
काय्देकर दूर
नामानीराळा पुर

नच घडणार्या आत्महत्त्या
नच पडणारा पाउस

वृत्तपत्रात दुष्काल ..वस्त्रांचा
कोर्टात खुन्यांच्या परवचा

गांधींच्या मनात धडकी
नोटेचे कितव्यांदा अवमूल्यन

गोर्यान्ना भय गोर्यांचे
काळयान्ना काळयांचे

इथेही तसेच काही

त्यात सीम्हासन गमाव्लेली यमके
अधीराज्यच्युत प्रास , अनुप्रास

अरे युगानंतर्च्या माणसा
तुला काय सांगू?
आम्ही असे जगत होतो?


--------------------


ॐकार कुलकर्णी

No comments: